केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवी दिल्ली, दि. ४ : उमेदवारी जाहीर करण्यात आम्हाला उशिर झाला. त्याचा फटका बसल्याची कबुली दिली आहे. शिवाय काही जागा आम्ही खुप कमी फरकाने पराभूत झालो आहोत असेही ते म्हणाले. शिवाय विरोधकांनी जो संविधान बदलण्याचा अपप्रचार केला त्यालाही आम्ही योग्य पद्धतीने तोंड देवू शकलो नाही. संभ्रम निर्माण केला गेला. त्याबाबत आम्ही निश्चितच मिमांसा करू असेही शिंदे म्हणाले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएला पुर्ण बहुमत मिळाले असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार बनवले जाईल असेही त्यांनी सांगितले. महायुतीचा विकासाचा अजेंडा यापुढेही चालूच राहील. मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. यापुढेही असेच काम सुरू राहील असेही ते म्हणाले. (Lok Sabha Election Result 2024) दरम्यान ठाणे आणि कल्याणमध्ये झालेल्या विजयाबाबत शिंदेंनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय ठाणे हा नेहमीच शिवसेनेचा गड राहीला आहे. तो गड आम्ही राखला त्यासाठी ठाणेकरांचे आभार मानतो असेही शिंदे म्हणाले. दरम्यान निवडणूकीचे आत्मपरिक्षण आपण निश्चित करू असेही ते म्हणाले.