निवडणूक आयोगाच्या या वाढीव आकडेवारीबद्दल नव्याने एक वाद निर्माण झाला आहे.
दिल्ली, दि. २४ : पहिल्या चार टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीबाबत मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका याव्यात अशी स्थिती आहेत. सर्वप्रथम मतदानाच्या टक्केवारीचे आकडे सार्वजनिक करण्यास आयोग विलंब करतो. मग ती आकडेवारी आणि नंतरची आकडेवारी यात फरक असतो व यंदा यात १ कोटी ७ लाख मतांची तफावत आहे. पाचव्या टप्प्यात मतदानाच्या टक्केवारीत ६२.२ टकक्यांपर्यंत वाढ झाल्याचे निवडणूक आयोगाने गुरुवारी सांगितले. त्यातही महिलांचा टक्का तुलनेने अधिक म्हणजे ६३ टक्के राहिला. मतदानाच्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार या टप्प्यात ६०.०९ टक्के मतदान झाले होते. दरम्यान देशात मतदानानंतर मतदानाचा टक्का वाढण्याची बाब गंभीर असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.निवडणूक आयोगाच्या या वाढीव आकडेवारीबद्दल नव्याने एक वाद निर्माण झाला आहे. निवडणूक सुधारणांसाठी काम करणाऱ्या एडीआर संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, निवडणुकीच्या ४ टप्प्यांनंतर मतदानाच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत असून आयोगाच्याच माहितीत तब्बल सुमारे १ कोटी ७ लाख मतांची तफावत आहे. काँग्रेसने यावर म्हटले आहे की, पहिल्या चार टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीच्या आकडेवारीबाबत मतदारांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका याव्यात अशी स्थिती आहेत.