लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तिसरा टप्प्यात विविध लोकसभा मतदारसंघांमध्ये आत्तापर्यंत मतदारांचा निरुत्साह दिसून आलेला आहे.
मुंबई, दि. ७ : लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यातील मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असून दुपारी एक वाजेपर्यंत 31.55% मतदान झाले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात 28.55% तर सांगली लोकसभा मतदारसंघात 29.65% मतदान झालेले आहे.