IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : NDA ला ३५०हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज

Sunday, Jun 02
IMG

इंडिया आघाडीचं सत्तेचं स्वप्न अपूर्णच राहाण्याची शक्यता आहे.

दिल्ली, दि. २ : लोकसभा निवडणूक २०२४ चे एक्झिट पोल आले आहेत.  विविध संस्थांनी दिलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार NDA तिसऱ्यांदा सत्तेवर येणाच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीचं सत्तेचं स्वप्न अपूर्णच राहाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांनीही या अंदाजांवर प्रतिक्रिया देताना ‘संधीसाधू’ आघाडी जनतेशी नाळ जोडण्यात अपयशी ठरली, असे म्हटले आहे.लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी सायंकाळी पार पडल्यानंतर उघड झालेल्या सर्व संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआला सरासरी ३५०हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांची इंडिया आघाडी १२५ ते १५० पर्यंतचा आकडा गाठेल, असे या चाचण्यांत म्हटले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सरासरी १३ मतदानोत्तर चाचण्यांनी रालोआला ३०६ आणि काँग्रेसप्रणित संपुआला १२० जागांचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात भाजपने ३०३ तर रालोआने ३५३ जागांवर विजय मिळवला होता. त्या विजयापेक्षाही अधिक जागा यंदा भाजपला मिळतील, असे यंदाचे अंदाज आहेत. 

Share: