नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोलीचे शिंदे गटाचे उमेदवारी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली.
नांदेड, दि. २० : देशातील २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. जे लोक स्वतःच्या आघाडीवर विश्वास ठेवत नाहीत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का? जे लोक स्वतःच्या आघाडीतच एकमेकांना तुरुंगात टाकण्याची भाषा करतात, अशा लोकांना लोकसभेत स्थान दिले तर तिथेही ते लोक एकमेकांविरोधात संघर्ष करतील. ४ जूननंतर इंडिया आघाडीचे नेते एकमेकांचे कपडे फाडतील”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या प्रचार सभेत केली.नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर आणि हिंगोलीचे शिंदे गटाचे उमेदवारी बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला. यासोबत पहिल्या टप्प्यात एनडीएला एकातर्फी मतदान झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. पहिल्या टप्प्यात मतदारांनी इंडिया आघाडाली नाकारले आहे. तुमच्याकडे कोणाचा चेहरा आहे. देश कोणाला सोपवायचा आहे हे तर सांगा," असा सवालही पंतप्रधानांनी इंडिया आघाडीला केला. यासोबत 'काँग्रेसचे नेता आपला पराभव मान्य केलाय. त्यांच्यात निवडणूक लढण्याची हिम्मत नाही. त्यांना उमेदवार मिळणे कठीण झाले आहे. यांचे नेते प्रचार करण्यासाठी जात नाहीत. २५ टक्के जागांवर इंडिया आघाडीचे लोक एकमेकांविरोधात लढत आहेत. काँग्रेसने दिलेल्या प्रत्येक जखमेचा इलाज करणे ही मोदींची गॅरंटी आहे. आमचा खूप वेळ काँग्रेसने केलेले खड्डे भरण्यात गेलाय. येणाऱ्या पाच वर्षात मराठवाडा आणि महाराष्ट्राला समोर न्यायचे आहे. काँग्रेसच्या शहजाद्याला वायनाडमध्ये पराभव दिसतो आहे. शहजाद्याला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी निवडणूक लढावी लागणार आहे. आधी अमेठी वरून पळावे लागले आणि आता वायनाड पण सोडावं लागणार. काँग्रेसचा परिवार स्वतः काँग्रेसला मतदान करणार नाही. अशी स्थिती असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.