IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

Loksabha Election Phase III : महाराष्ट्रात ९ वाजेपर्यंत ६.६४ टक्के मतदान, माढ्यात सर्वाधिक कमी मतदान

Tuesday, May 07
IMG

महाराष्ट्रात ६.६४ टक्के मतदान पार पडले आहे. तर सर्वाधिक कमी माढा मतदारसंघात ४.९९ टक्के मतदान झाले आहे.

मुंबई, दि. ७ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशातील १० राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ९३ जागांसाठी मतदान होत आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ६.६४ टक्के मतदान पार पडले आहे. तर सर्वाधिक कमी माढा मतदारसंघात ४.९९ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत कुठे किती टक्के मतदान?रत्नागिरी सिंधुदुर्ग - ८.१७कोल्हापूर - ८.०४लातूर - ७.९१उस्मानाबाद - ५.७९हातकणंगले - ७.५५सातारा - ७.००रायगड - ६.८४सोलापूर - ५.९२सांगली - ५.८१बारामती - ५.७७माढा - ४.९९

Share: