IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election Phase III : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा फोटो

Tuesday, May 07
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पाहा फोटो...

मुंबई, दि. ७ : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशातील १० राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये ९३ जागांसाठी मतदान होत आहे. याबरोबरच महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. पाहा फोटो...-----भाजपचे जेष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे.उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार, आई आशाताई पवारांसह बजावला मतदानाचा हक्कआमदार रोहित पवार, वडील राजेंद्र पवार यांनी कुटुंबीयांसह बारामती मधील पिंपळी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते- पाटील यांनी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा  हक्क बजावला.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.कोल्हापुरात संभाजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनी मतदान केले. लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला. 

Share: