IMG-LOGO
लोकसभा २०२४

Loksabha Election Result : विकसित भारताचा हा विजय : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Tuesday, Jun 04
IMG

भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही.

नवी दिल्ली, दि. ४ : लोकसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. ५४३ पैकी ५४२ जागांवर मतमोजणी झाली. यामध्ये भाजपाच्या नेतृत्त्वाखालील NDA ला स्पष्ट बहुमत मिळालं. पण, भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केलं. NDA चं देशात तिसऱ्यांदा सरकार होणार हे स्पष्ट आहे, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं. ही देशवासीयांचा आभारी आहे. हा विकसित भारताचा विजय आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी सांगितलं, 'आजचा विजय देशातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा विजय आहे.  (Lok Sabha Election Result 2024)  भारताचा राज्यघटनेवरील निष्ठेचा विजय आहे. विकसित भारताच्या संकल्पनेचा विजय आहे. हा सबका साथ-सबका विकास या मंत्राचा विजय आहे. हा १४० कोटी भारतीयांचा विजय आहे.'

Share: