जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली.
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यावरून बोचऱ्या शब्दात राज्य सरकारवर टीका केली आहे. चादर लगी फटने, खैरात लगी बटने, असं म्हणत त्यांनी अर्थसंकल्पाचं वर्णन केलं आहे.जयंत पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीचा मोठा धसका घेतला आहे. आजच्या अर्थसंकल्पात त्यांनी ज्या काही घोषणा केल्या आहेत, त्यावरून स्पष्ट झालं काही त्यांना आगामी विधानसभेतील त्यांच्या पराभवाची भीती वाटते आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून पेसै वाटण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा त्यांचा शेवटा प्रयत्न आहे. आजचा अर्थसंकल्प सरकारकडून अतिशय बेजाबदारपणे मांडण्यात आला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.