IMG-LOGO
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Budget 2024 : अर्थसंकल्प फुटला; अर्थसंकल्पसंदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये : शरद पवार

Saturday, Jun 29
IMG

या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कितपत होईल, याची शंका मला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

मुंबई, दि. २९  : मी काही आज अर्थसंकल्प सादर करत नाहीये. या सगळ्या गोष्टींमध्ये मी नवखा नाही. यावेळी मी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे. सर्व तांत्रिक आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन, केंद्र सरकारचं खर्चासंदर्भातलं ३ टक्क्यांचं बंधन लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे”, असं अजित पवार शुक्रवारी म्हणाले होते. या विधानावरून शरद पवार यांनी टीका केली आहे. अर्थसंकल्प फुटल्याचं विधान केलं आहे. “अर्थसंकल्पसंदर्भातली माहिती आधी बाहेर येता कामा नये. कारण त्याला अर्थसंकल्प फुटला असं म्हणतात. काल अर्थसंकल्प मांडण्यात आला. पण त्याच्या आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत अर्थसंकल्पात काय काय येणार आहे, ते छापून आलं होतं. मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांना अमुक रक्कम दिली जाईल, वारीतील दिंडीला २० हजार रुपये अशा अनेक गोष्टी विधानभवनात मांडण्यापूर्वीच बाहेर आल्या होत्या. याचा अर्थ स्पष्ट आहे. अर्थसंकल्पाची गुप्तता पाळली गेली नाही”, असं शरद पवार म्हणाले.  “अर्थसंकल्प पाहता असं दिसतंय की ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाही, येण्याची तरतूद नाही अशा गोष्टी त्यात सांगण्यात आल्या आहेत. पूर्ण अर्थसंकल्प ३ महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून मांडला आहे. सर्व तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. तरतूद कमी रकमेची करायची आणि प्रत्यक्षात सुचवायचं अधिक रक्कम दिली जाईल. म्हणजे जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींचे आकडे पाहिले तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतोय असं दाखवणारा आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास बसणार नाही. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कितपत होईल, याची शंका मला आहे”, असं शरद पवार म्हणाले.

Share: