IMG-LOGO
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Session : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

Thursday, Jun 27
IMG

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई, दि. २७ : राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असेल. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा गोंधळ, पायऱ्यांवरील घोषणाबाजी आणि त्यानंतरचा शोकप्रस्ताव अशा कार्यक्रमानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पूर्ण झाला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे विधान भवन पायऱ्यांवर आंदोलन केलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या समोर विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी. 'शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची वीजबिल माफ करावी, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी', अशा घोषणा यावेळी विरोधकांनी केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना कर्जमाफी,  बिल मुक्ती मिळालीच पाहिजे अशा स्वरूपाच्या जोरदार घोषणा दिल्या. 

Share: