IMG-LOGO
महाराष्ट्र

ठाकरे-फडणवीस विधानभवनात एकाच लिफ्टमध्ये; चर्चांना उधान

Thursday, Jun 27
IMG

राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली.

मुंबई, दि. २७ : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघेही विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडले आणि दोघेही वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांनादेखील लिफ्टमध्ये काय बोलणं झालं? असा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी त्याचा विचार करावा.”विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून (दि. २७) सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी सर्वपक्षीय नेते आणि आमदार विधीमंडळात दाखल झाले आहेत. दरम्यान, शिसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तथा विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विधानभवनातील एकाच लिफ्टने प्रवास केला. यावेळी त्यांच्याबरोबर प्रवीण दरेकर, छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरही लिफ्टमध्ये होते. यावेळी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात काही बोलणं झालं का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. उद्धव ठाकरेंसह झालेल्या भेटीबद्दल सांगताना प्रवीण दरेकर यांनी राजकारणात आपण कायमचे शत्रू नसतो असं सांगितलं. पुढे ते म्हणाले की, "मी लिफ्टमध्ये असताना उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही आले. मिलिंद नार्वेकरही तिथे होते. त्यावेळी कोणीतरी तुम्ही एकत्रित आहात हे पाहून बरं वाटतं असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी याला आधी बाहेर काढा असं सांगितलं. तर मी म्हणालो तुमचं अजून समाधान झालं नाही. माझी बाहेर जायची तयारी आहे, तुम्ही होता का एकत्र. बोलता तसं करा". पुढे ते म्हणाले की, "यानंतर हास्यविनोद झाले. आम्ही लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर ते विरोधी आणि आम्ही सत्तेच्या दिशेला गेलो. त्यांची मानसिकता विरोधी पक्षात राहण्याची आहे, सत्तेच्या दिशेला ते आले नाहीत. आमचे दोन वेगळे मार्ग दिसून आले". यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, आम्ही सर्वजण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर गेलो. लिफ्टमध्ये जाणं आणि बाहेर पडण्यात वेळ गेला. त्यामध्य किती भेटणार, किती बोलणार? लिफ्टमध्ये सर्वांनी हस्तांदोलन केलं. 

Share: