विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बीआरएस विलीन होणार आहे.
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र विधानसभानिवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राज्यातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार चांगलेच ऍक्टिव्ह झाले असून अनेक नेत्यांना आपल्या गळाला लावले आहे. त्यातच राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधीच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बीआरएस विलीन होणार आहे. येत्या ६ ऑक्टोबरला हजारोंच्या संख्येने पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये बीआरएस हा पक्ष विलीनहोण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण बीआरएस कार्यकारिणी आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करतील. बीआरएसचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक बाळासाहेब देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे.