IMG-LOGO
शिक्षण

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध

Wednesday, Aug 14
IMG

प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे आयोगाने कळविले आहे.

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे आयोगाने कळविले आहे.प्रवेशप्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contact- secretary@mpsc.gov.in व support-online@mpsc.gov.in या ईमेल व/अथवा ०२२६९१२३९१४ किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरुन विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल असे आयोगाने कळविले आहे. 

Share: