IMG-LOGO
राष्ट्रीय

PM MODI 3.0 : महाराष्ट्रातील ६ खासदारांना मंत्रिपदासाठी फोन

Sunday, Jun 09
IMG

मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याची बातमी समोर आली आहे.

दिल्ली, दि. ९ : नरेंद्र मोदी आज (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर ३० खासदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राला कोणती खाती मिळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी अनेक खासदारांना भाजपा पक्षनेतृत्वाने फोन केल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांना मंत्रिपदासाठी फोन आले आहेत. त्यात भाजपचे नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. तर रामदास आठवलेंना पुन्हा केंद्रात मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या प्रतापराव जाधवांनाही मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे. यावेळी प्रतापराव जाधव आणि रक्षा खडसे पहिल्यांदाच केंद्रात मंत्री होणार आहेत.

Share: