विधानसभेला काँग्रेस किती जागा लढणार याचा निर्णय काँग्रेसच्या चार ऑगस्टच्या बैठकीत चर्चेअंती होईल.
कराड, दि. ३१ : राज्यात सत्ता मिळवण्यासाठी घोडेबाजार झाल्याची चीड लोकांमध्ये असून, आता त्यांनी विश्वासघात करणाऱ्यांना शिक्षा करायची की बक्षीस द्यायचे? हे ठरवावे, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये केला. विधानसभेला काँग्रेस किती जागा लढणार याचा निर्णय काँग्रेसच्या चार ऑगस्टच्या बैठकीत चर्चेअंती होईल. महाविकास आघाडीचे याआधीच विधानसभा निवडणुकीचे सूत्र ठरलेलेच आहे. परंतु, तीनही पक्ष एकत्रित बसून अंतिम निर्णय घेतील, असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले.