सरकारने बँकांना पुरेशी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही तुळजापूरकर यांनी केली.
मुंबई, दि. २० : राज्यातील बँक कर्मचाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी संपाची घोषणा केली आहे. 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' राबवताना सुरक्षित वाटत नसल्याचे बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने हा संप पुकारला आहे. बीड, जालना, लातूर, धुळे आणि पुणे जिल्ह्यात लाडकी बहिण'योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान बँक कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याचा आरोप युनियनने केला आहे. नवीन खाती उघडण्यासाठी, आधार लिंक करण्यासाठी आणि निष्क्रिय खाती सक्रिय करण्यासाठी काउंटरवर लोकांची मोठी गर्दी होत असल्याचा दावा युनियनने केला आहे. तसेच, राज्याच्या विविध भागात योजनेचे लाभार्थी आणि स्थानिक नेत्यांकडून बँक कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळेच आम्ही एकदिवसीय संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी सरकारने बँकांना पुरेशी सुरक्षा आणि अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही तुळजापूरकर यांनी केली.