अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले.
मुंबई, दि. ११ : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांचे निधन झाले आहे. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी आत्महत्या केली. त्यांनी इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवलं आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीच्या सातव्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. अनिल अरोरा यांच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मलायका अरोराच्या वडिलांनी आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अनिल अरोरा यांनी आज (दि. ११ ) सकाळी आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे येथील सात मजली इमारतीच्या छतावरून अनिल अरोरा यांनी सकाळी ९ वाजता उडी घेतली.