Manoj Jarange Patil Second phase of peace rally concludes in Nashik today
नाशिक, दि. १३ : विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रात दौरे, मतदारसंघाचा आढावा, बैठका, मेळावे, सभा असं सर्व चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यातच महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कसा असणार? याबाबतही खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दाही तापलेला आहे. मनोज जरांगे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात जनजागृती शांतता रॅली सुरु केलेली आहे. या रॅलीचा पहिला टप्पा मराठवाड्यातील जिल्ह्यात पार पडला. यानंतर आता या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. आता या शांतता रॅलीचा दुसऱ्या टप्पाचा समारोप नाशिकमध्ये होणार आहे.मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलेली आहे. या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन आणि उपोषणही केलं. मात्र, राज्य सरकारने याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशारा दिला आहे.