IMG-LOGO
नाशिक ग्रामीण

विधानपरिषद निवडणुकीत फुटलोच नाही तर बदनामी का सहन करू : खोसकर

Tuesday, Jul 16
IMG

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन उमेदवार निवडणुकीत उभे केले होते.

इगतपुरी, दि.१६  :  विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी घडत आहे. या निवडणुकीत पक्षाची मतं फुटली, असं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मान्य केलं. आम्ही ट्रॅप लावला होता, त्यामध्ये आमदार अडकले, आता त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची घोषणा पटोले यांनी केली आहे. यावर आमदार खोसकर यांनी मोठ विधान केले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन उमेदवार निवडणुकीत उभे केले होते. मात्र, तीन पैकी दोन उमेदवारांचा विजय झाला तर एका उमेदवाराचा पराभव झाला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची जवळपास ७ मतं फुटल्याचं चर्चा आहे. काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. हिरामण खोसकर यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत कुणाला मतदान केलं हे देखील सांगितलं. मी पहिलं मत मिलिंद नार्वेकर, दुसरं  जयंत पाटील आणि तिसरं डॉ. प्रज्ञा सातव यांना दिलं. काँग्रेस पक्षानं सांगितलं त्याप्रमाणेच मतदान केलं. जयंत पाटील यांना कुणाला मतदान करायला सांगितलंय हे आम्हाला माहिती नव्हतं,' असं खोसकर यावेळी म्हणाले. “विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी एक दिवस हॉटेलमध्ये आमची सर्वांची चर्चा झाली होती. यावेळी कोणाला मतदान द्यायचं? हे ठरलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहायचं असं ठरलं. त्यानंतर साडेसात वाजता सर्व आमदार आले आणि चर्चा सुरु झाली. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हे ११ वाजता आले. त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली. आम्हाला सात जणांना मिलिंद नार्वेकरांना मतदान करायचं आणि सहा जणांना शेकापचे जयंत पाटील यांना मतदान करायचं आणि २५ आमदारांनी प्रज्ञा सातव यांना मतदान करायचं असं सांगण्यात आलं होतं”, असं हिरामण खोसकर म्हणाले.खोसकर पुढे म्हणाले, “विधानपरिषदेसाठी कशा पद्धतीचे मतदान करायचं याबाबतही सांगण्यात आलं होतं. पण यामध्ये एक मतदान फुटलं. ते मतदान कुणाचं फुटलं? मग जयंत पाटील यांना काँग्रेसचे सहा मत द्यायला सांगितले होते. पण काँग्रेसचं एकही मत त्यांना पडलं नाही. आता त्या सहा लोकांवर कुठलीही कारवाई केली नाही. मग ते सहा आमदार कोण होते, ते त्यांना माहिती नाही का? मागच्यावेळी माझ्याकडून चूक झाली होती. त्यानंतर मी वरिष्ठांना सांगितलं होतं की माझ्याकडून चूक झाली. पण यावेळी मी शपथ घेतली होती की मी चुकणार नाही. पण जे सहा आमदार फुटले त्यांच्यावर कारवाई न करता माझी बदनामी सुरु केली आहे, ही बदनामी वरिष्ठांनी थांबवली पाहिजे”, असंही हिरामण खोसकर म्हणाले.

Share: