कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे.
मुंबई, दि. २ : राज्यात ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता १ ऑगस्ट ते ४ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बांगला देशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता.पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं येत्या 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत तुरळक ठिकाणी अतितीव्र हवामान असणार आहे.