IMG-LOGO
राष्ट्रीय

मुंबई-गोवा महामार्गाचे काम १४ वर्षापासून रखडले, कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; एकास अटक

Thursday, Aug 29
IMG

९७ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे, तर २०८ प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत.

मुंबई, दि. २९ : गेल्या जवळपास १४ वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची ठेकदार चेतक इंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक हुकुमीचंद जैन,जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह आणि प्रकल्‍प समन्‍वयक अभियंता सुजित कांबळे यांच्याविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात समन्‍वयक अभियंता सुजित कांबळे यांना पोलीसांनी अटक केली आहे. या महामार्गाचे काम गेली १४ वर्षे रखडले आहे. त्यामुळे कोकण वासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर ते वडपाले दरम्‍यान महामार्गाचे काम दर्जाहीन, प्रवाशांच्‍या सुरक्षेबाबत निष्‍काळजीपणा असल्याचे समोर आले होते. या मार्गावरवाहनांचे अपघात होवून प्रवाशांच्‍या मृत्‍यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्‍याचा ठपका ठेकेदारावर ठेवण्यात आला आहे. २०२० पासून या मार्गावर १७० अपघात झाले असून यात ९७  प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे, तर २०८ प्रवाशांना दुखापती झाल्या आहेत. 

Share: