IMG-LOGO
महाराष्ट्र

घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या १४ वर ; युद्धपातळीवर महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम

Tuesday, May 14
IMG

या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे.

मुंबई, दि. १४ : मुंबईत झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय लोखंडी जाहिरात फलक पेट्रोल पंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे.१५ हजार चौरस फुटाचं हे होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळलं. यावेळी पाऊस असल्याने अनेक वाहनंही पेट्रोल पंपावर थांबलेली होती. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सने ८८ दुर्घटनाग्रस्तांची नोंद केली आहे, त्यापैकी ७४ जणांमध्ये हे रेक्यू केलेल्या आणि जखमींची नोंद आहे. जे होर्डिंग कोसळलं आहे, त्यासह हे ८ होर्डिंग्स गृह विभाग आणि महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळाच्या मालकीच्या जमिनीवर बीएमसीची परवानगी न घेता उभारण्यात आले होते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यापूर्वी बेकायदेशीर होर्डिंग्जबद्दल तक्रार केली होती, ज्यामुळे बीएमसीकडून जीआरपीला ते हटवण्याची नोटीस देण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच, जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात कलम ३०४, ३३८, ३३७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाटकोपर येथील घटनास्थळाला रात्री उशिरा भेट दिली. “घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्देवी अपघाताच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली तसेच मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला.

Share: