अन्वी कामदार असे या तरुणीचे नाव असून ती व्यवसायाने सनदी लेखापाल होती.
अलिबाग, दि. १७ : माणगाव तालुक्यातील कुंभे येथे पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील तरुणीचा इन्स्टाग्रामसाठी रिल करताना दरीत पडून मृत्यू झाला. अन्वी कामदार असे या तरुणीचे नाव असून ती व्यवसायाने सनदी लेखापाल होती. समाज माध्यमावर इन्फ्ल्यूएन्सर म्हणूनही ती नावारूपास आली होती.कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षीत बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीच्या साह्याने ही बचाव पथके दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. तीला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीने ओढून वर काढण्यात आले. मात्र माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.