IMG-LOGO
महाराष्ट्र

संकेत बावनकुळेंच्या गाडीमध्ये दारूसह बीफ कटलेटची बिले आढळली, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Wednesday, Sep 11
IMG

आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे.

मुंबई, दि. ११  : महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री तीन ते चार दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिल्याची घटना समोर आली. या अपघातात काहीजण जखमी झाले होते. यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीत तपास पोलीस करत आहेत. या घटनेत संकेत बावनकुळे यांचे नाव असल्यावरून विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, “संकेत बावनकुळे यांच्या गाडीमध्ये एका लाहोरी बारचं बिल मिळून आलं. त्यामध्ये संकेत बावनकुळे यांच्या खाण्या-पिण्याचा उल्लेख आहे. या बिलावर दारू, चिकन, मटणासह बीफ कटलेटचाही समावेश आहे. मग हिंदूत्व शिकवणाऱ्या लोकांनी बीफ कटलेट खाल्ले आहे. मग भाजप हिंदूत्व शिकवणार का?”, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

Share: