काँग्रेसच्या युवराजांकडून वीर सावरकरांबद्दल चांगली वाक्ये वदवून घ्यावी. असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी दिले.
ठाणे, दि. १५ : काँग्रेसवाले सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान करत असतात. मात्र नकली शिवसेनावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. नकली शिवसेनेमध्ये काँग्रेसला असं करण्यापासून रोखण्याची हिंमत नाही. ते काँग्रेसला काही बोलूच शकत नाहीत. महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या लोकांना मी आव्हान देतो की त्यांनी काँग्रेसच्या युवराजांच्या तोंडून वीर सावरकरांबद्दल पाच चांगली वाक्ये वदवून घेऊन दाखवावी. माझं इंडिया आघाडीला आव्हान आहे, त्यांच्या मोठ्या नेत्यांना माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी काँग्रेसच्या युवराजांकडून वीर सावरकरांबद्दल चांगली वाक्ये वदवून घ्यावी. असे आव्हान नरेंद्र मोदी यांनी दिले. काँग्रेसवाले सातत्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा अपमान करत असतात. मात्र नकली शिवसेनावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. नकली शिवसेनेमध्ये काँग्रेसला असं करण्यापासून रोखण्याची हिंमत नाही. ते काँग्रेसला काही बोलूच शकत नाहीत. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.