IMG-LOGO
महाराष्ट्र लोकसभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना NDA मध्ये येण्याची ऑफर

Friday, May 10
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली.

नंदुरबार दि. १० :  छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे, असे शरद पवार यांनी विधान केलं होतं. त्यांच्या विधानाचा अर्थ असा आहे की, नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना पक्षाने काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन तयार केलं आहे. मात्र, मी त्यांना सांगतो ४ जूननंतर काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या. सर्व स्पप्न पूर्ण होतील”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेत बोलताना मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटावर टीका केली. “नकली शिवेसना मला जिवंत गाडण्याची भाषा करते. मात्र, मी बाळासाहेब ठाकरे यांना जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आज किती दु:ख होत असेल, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. यानंतर त्यांनी शरद पवारांच्या विधानावर भाष्य केले.

Share: