IMG-LOGO
राष्ट्रीय

Pm Kisan Yojana : योजनेच्या १७व्या हप्त्यासाठीचे २० हजार कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा

Tuesday, Jun 18
IMG

देशभरात या योजनेशी निगडीत तब्बल ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये जमा झाले आहेत.

वाराणसी, दि. १८ :  लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मतदारसंघात, अर्थात वाराणसीमध्ये दौरा केला. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी मोठी घोषणा केली आहे. पीएम किसान योजनेच्या १७व्या हप्त्यासाठीचे तब्बल २० हजार कोटी रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे देशभरात या योजनेशी निगडीत तब्बल ९ कोटी २६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ हजार रुपये जमा झाले आहेत.

Share: