महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.
नाशिक, दि. १९ : नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलं आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आले. नाशिकच्या गोदाघाटावरून शांतीगिरी महाराज यांनी भव्य रॅली काढली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन अटळ मानले जाते. हे विभाजन टाळण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी मनधरणी केली, पण महाराजांनी निवडणूक लढण्याचा पवित्रा कायम ठेवला. हजारो भक्त परिवाराला सक्रिय प्रचारात उतरवित त्यांनी राजकीय पक्षांना आव्हान दिले आहे.