IMG-LOGO
नाशिक शहर

Nashik Teachers Constituency Election 2024 : नरहरी झिरवळ यांचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

Thursday, Jun 20
IMG

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

नाशिक, दि. २० :  विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमदेवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा धक्का मानला जात आहे. विधान परिषद निवडणुकीत अजित पवारांच्या आमदारानेच उद्धव ठाकरेंच्या उमदेवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार संदीप गुळवे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने किशोर दराडे यांना उमेदवारी दिलेली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही महेंद्र भावसार यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणं अपेक्षित असताना झिरवळ यांनी गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Share: