IMG-LOGO
नाशिक शहर

लाच घेणार नाही असा निर्धार प्रत्येकाने केल्यास राष्ट्रनिर्माण सहज शक्य : डॉ. शेटे

Saturday, May 04
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व.डाॅ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यानात ते 'सात्विक रुग्णसेवा' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. ४  :  अपिल ही हृदयातून करावी लागते. सामान्य माणसासाठी भीक मागितली. पण ती भीक नव्हती, तर आशीर्वाद असते. लाच घेणार नाही असा निर्धार केल्यास त्यातूनच राष्ट्रनिर्माण होईल, असे प्रतिपादन आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व.डाॅ. वसंतराव पवार स्मृती व्याख्यानात ते 'सात्विक रुग्णसेवा' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला कै. पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखवुन आणि प्रतिमापूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तर डॉ. शेटे यांच्या कार्याचीही चित्रफितीद्वारे ओळख करून देण्यात आली. डॉ. व्ही. आर. काकतकर यांनी डॉ. शेटे यांचा सत्कार केला. त्यानंतर डॉ. राज नगरकर, प्रणव पवार व डॉ. काकतकर यांचा सत्कार करण्यात आला. श्री.शेटे म्हणाले की, रूग्णसेवा एकीकडे इंडस्ट्री होत असताना ती सात्विक कशी ? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. तसा तो मलाही पडला. एकीकडे भारत आर्थिक महासत्ता होत असताना एखादा रुग्ण उपचारांअभावी मरत असेल तर हा भारत माझा नाहीच. या विचारातून सुरवातीपासूनच झपाटून काम केले. मित्राने पाचवेळा मृत्युशी झुंज दिली. ती प्रत्यक्ष अनुभवले अन तेव्हापासून  झपाटून कामाला लागलो. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणिस यांनी ठामपणे पाठीशी उभे राहून पाठबळ दिले. त्यांच्या आणि प्रवीणसिंह यांच्यासोबतच्या पहिल्या बैठकितिल अनुभवासह विविध हृदयस्पर्शी अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी सात्विक रूग्णसेवा ही संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले, मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करता आले पाहिजे. म्हणूनच मी दिल्लीत गेलो तरी महाराष्ट्राला विसरलो नाही. कायदा मोडला नाही, पण प्रसंगी याच कायद्याची चौकट मोठी केली; पण उपचाराअभावी कुणाला मरू दिले नाही. हर्ट ट्राण्सप्लाण्टचे अनेक शिबिर घेतले. काय वाटेल ते करून गोरगरिबांना आजही शासकीय योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी आम्ही झटत असल्याचेही त्यांनी सांगितले. वीरशैव जंगम समाजातर्फे डॉ. शेटे यांचा सत्कार करण्यात आला.सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानानंतर नाशिकमधील गायक-गायिका अविस्मरणीय व कर्णमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर करतात. यामध्ये आज स्वरसंगम प्रस्तुत ज्येष्ठ कवयित्री व गीतकार शांताबाई शेळके यांच्या गीतांवर आधारित 'सुमधुर गीतांचा नजराणा' सादर करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, उपाध्यक्षा संगीता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे यांच्यासह  पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले. अविनाश वाळूजे यांनी आभार मानले.

Share: