IMG-LOGO
मनोरंजन

नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा सिक्वेल १९ वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला

Sunday, Jul 21
IMG

२० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ’नवरा माझा नवसाचा २’प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबई, दि. २१ : १९ वर्षानंतर नवरा माझा नवसाचा या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २० सप्टेंबर २०२४ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.सोशल मीडियावर चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल एक टीझर प्रदर्शित केला आहे. यावेळचा प्रवास रेल्वेचा, कोकण रेल्वेचा म्हणत, नवरा माझा नवसाचा २ हा चित्रपट २० तारखेला प्रदर्शित होणार असल्याचे टीझर मध्ये सांगण्यात आले आहे.  ‘नवरा माझा नवसाचा २’ मध्ये अशोक सराफ, सुप्रिया पिळगांवकर, सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, हेमल इंगळे, वैभव मांगले, निर्मिती सावंत हे दिग्गज कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटात अशोक सराफ बस कंडक्टरच्या भूमिकेत दिसले होते, आता मात्र चित्रपटाच्या दुसऱ्या भागात ते टीसीच्या भूमिकेत दिसत आहेत. सुश्रिया चित्र निर्मित हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर करताना मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन ‘नवरा माझा नवसाचा २’ ही नॉनस्टॉप कॉमेडी निघाली आहे गणपतीपुळ्याला. पण या वेळेला एसटी ने नाही तर कोकण रल्वेने. तुम्ही येताय ना हा प्रवास बघायला ? २० सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात ’नवरा माझा नवसाचा २’प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे.

Share: