IMG-LOGO
राष्ट्रीय

PM MODI 3.0 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मंत्रिमंडळात स्थान नाही

Sunday, Jun 09
IMG

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा देण्यात येणार होती.

नवी दिल्ली, दि. ९ :  नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असून आज त्यांच्या मंत्रीमंडळात भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला स्थान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भाजपाच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक जागा देण्यात येणार होती. तसा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला होता. राज्यमंत्री स्वतंत्र्य प्रभार, अशी ही जागी होती. मात्र, त्यांना केंद्रीय मंत्रीपद मिळावं, असा त्यांचा आग्रह होता. ‘आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव अंतिम करण्यात आलं असून ते यापूर्वी मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देता येणार नाही’, असं राष्ट्रवादीकडून ( अजित पवार गट) सांगण्यात आलं, त्यामुळे केंद्रीय मंत्रीमंडळात अजित पवार गटाचा समावेश नसेल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Share: