IMG-LOGO
महाराष्ट्र

अजित पवार गटातील आमदार पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; एकाचा मृत्यू, एक गंभीर

Sunday, Jun 23
IMG

मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले.

पुणे, दि. २३ : पुण्यातल्या पोर्शे कार अपघाताची घटना ताजीच असताना आता आणखी एक अपघात पुण्यात झाला. या अपघातात आमदाराच्या पुतण्यानेच दोघांना आपल्या कार खाली चिरडले आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात झाला. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहिते यांनी हा अपघात केला आहे. त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  पुणे नाशिक महामार्गावर हा अपघात कळंब जवळ झाला आहे. अपघाता वेळी मयूर मोहिते हा कार चालवत होता. त्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार टक्क दिली. यात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. 

Share: