IMG-LOGO
राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला शहर व केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश

Saturday, Jul 20
IMG

लाखो तरुण विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आम्हाला सर्व बाजू तपासून, पुरावे पाहून निकाल द्यायचा आहे.

गुमला, दि. २०  :  नीट-यूजी पेपल लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी (१८ जुलै) महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी एनटीएला (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. एनटीएने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पार्दीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा-पदवी २०२४ (नीट-यूजी २०२४) शी संबंधित सर्व याचिकांवर आज निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-यूजी २०२४ नव्याने घेण्यासाठी संपूर्ण परिक्षा प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याचा ठोस पुरावा असायला हवा. आम्ही या प्रकरणावर लवकरच अंतिम निकाल देऊ. लाखो तरुण विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. आम्हाला सर्व बाजू तपासून, पुरावे पाहून निकाल द्यायचा आहे. धनंजय चंद्रचूड म्हणाले, “आपण केंद्रनियाह निकाल जाहीर करायला हवेत जेणेकरून आकडेवारीचं, गुणांचं स्वरूप स्पष्ट होईल.” तर या सुनावणीवेळी नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीएने म्हटलं की “आमच्याकडून परीक्षेच्या नियोजनात कुठलीही कसर राहिली नव्हती. याचिकाकर्त्यांचे आमच्यावरील आरोप खोटे आहेत.”  

Share: