IMG-LOGO
महाराष्ट्र

होती दाढी म्हणून उखडून टाकली तुमची महाविकास आघाडी : एकनाथ शिंदे

Saturday, Oct 12
IMG

शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

मुंबई, दि. १२  : महाविकास आघाडी सरकार असताना आधीच्या सरकारच्या योजनांना ब्रेक लावण्याचा सपाटा सुरू केला होता. दिसेल त्या योजनांना ब्रेक लावला. समृद्धी महामार्ग योजनेला ब्रेक, मेट्रो ३ योजनेला ब्रेक, बुलेट ट्रेनला ब्रेक, जलयुक्त शिवार योजनेला ब्रेक, मराठवाडा ग्रीन फिल्डला ब्रेक, जिथं नाही ब्रोकर तिथं स्पीड ब्रेकर. त्यामुळे आम्ही हे स्पीड ब्रेकर उखडून टाकले तसेच हे सरकारही उखडून टाकले. त्यांना माझी दाढी खुपते, पण होती दाढी म्हणून उखडून टाकली तुमची महाविकास आघाडी अशी टाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.एकनाथ शिंदे म्हणाले की, जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर लाडकी बहीण योजना आलीच नसती. म्हणून आम्ही या सरकारलाच उखडून फेकलं.मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं आमचं सरकार आहे. राज्यातील १० लाख लाडक्या भावांना सरकारने भत्ता दिला आहे. सर्वात मोठं मेट्रोचं जाळ करणारे हे राज्य बनले. मागील अडीच वर्षात सरकारने घेतलेले निर्णय पाहिले तर कुठे आले असे वाटेल. कोविड काळात घरात लपून बसणारा मुख्यमंत्री नाही. लोकांच्या हितासाठी लढणारा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं तर उद्योग आले नसते,नोकऱ्या मिळाल्या नसत्या. लाडक्या बहि‍णींची योजना आली नसती. शासन आपल्या दारी आले नसते. जेष्ठांना वयोश्री योजना आली नसती. केवळ दोन वर्षात इतक्य कमी काळात हे सरकार राज्यातील लाडकं सरकार झालं आहे. लाडक्या बहिणींचे,भावांचे,शेतकऱ्यांचे लाडकं सरकार झालंय. अन्यायाला लाथ मारा अशी बाळासाहेबांची शिकवण. त्यामुळेच त्या विरोधात लढण्यासाठी आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता तर सच्च्या शिवसैनिकांचा अपमान झाला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्षे मागे पडला असता. आमच्या सरकारने राज्याला नंबर एकवर आणलं. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांपासून शिवसेनेला मुक्त केलं. 

Share: