IMG-LOGO
नाशिक शहर

जगात फक्त भारतालाच हजारो वर्षांचा 'इतिहास' : निलेश ओक

Friday, May 24
IMG

वसंत व्याख्यानमालेत स्व. शांतारामबापु वावरे स्मृती व्याख्यानात ते 'नक्षत्राचे देणे- भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास' या विषयावर बोलत होते.

नाशिक, दि. २४ : हिस्ट्री आणि इतिहास यातील अस्पष्ट सीमारेषा लक्षात घेतल्यास या जगात फक्त भारतालाच इतिहास आहे. चौदा हजार वर्षांपूर्वी घडलेले रामायण आणि सात हजार वर्षांपूर्वीचे महाभारत हे त्याचे पुरावे आहेत. याबाबत आपल्या ऋषी-मुनीनी सखोल संशोधन केलेले आहे. त्या आधारे आपण त्या काळातील कोणत्याही घटनेची तारीखवार माहिती घेऊ शकतो. असे प्रतिपादन मँसेच्युसेट्स, अमेरिका येथील लेखक, संशोधक आणि TEDx-Keynote वक्ता निलेश ओक यांनी येथे केले. वसंत व्याख्यानमालेत स्व. शांतारामबापु वावरे स्मृती व्याख्यानात ते 'नक्षत्राचे देणे- भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास' या विषयावर बोलत होते. सुरुवातीला स्व. शांतारामबापु वावरे यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्रफीत दाखवून व त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. स्व. वावरे यांचे नातु डॉ. नितीन हिरे, गोदावरी बँकेचे जनसंपर्क संचालक प्रणव पवार, विनजित टेक्नॉलॉजस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी मकरंद सावरकर व्यासपीठावर उपस्थित होते. व्याखानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. श्री. ओक  म्हणाले की, भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास शक्य झाला तो नक्षत्रामुळे. मुळात भारताला इतिहास आहे का या प्रश्नाचे उत्तर आहे होय, केवळ भारतालाच इतिहास आहे. हे समजून घेण्यासाठी त्यांनी हिस्ट्री आणि इतिहास या दोन्हींची विभागणी करून धर्म, काम, मोक्ष या निकषांवर आपले विचार मांडले. ते म्हणाले की भारताला इतिहास नाही असा प्रचार आपणच करत असतो. वास्तविक तो लिहून ठेवला पाहिजे. त्यासाठी समृद्ध भाषा जी फार बदलता कामा नये, टाईम स्टँप आणि गुरू शिष्य परंपरा या तीन गोष्टी असणे गरजेचे असते. पृथ्वी आणि सुर्य यांच्या वेगवेगळ्या स्थीतीनूसार चार बदल होत असतात. ते म्हणजे ध्रुव तारा बदलतो, ऋतूसापेक्ष सूर्याचे नक्षत्र बदलते, चांद्रमासाचा ऋतु बदलतो, ताऱ्यांची पृथ्वीसापेक्ष स्थिती बदलते हे ते चार परिणाम होत. महाभारतात ध्रुव ताऱ्याचा उल्लेख येत नाही. रामायणात तो येतो. ध्रुव तारा हा साधारण 12 हजार वर्षांपूर्वीचा आहे. याच धर्तीवर त्यांनी तारीखवार उल्लेख करत चारही परिणामांची सविस्तर चर्चा केली. या निमित्ताने त्यांनी साडेसहा हजार पाचशे वर्षांपूर्वीच्या ग्रहस्थितीचेही विवेचन केले. भारतीय ऋषीनी या सर्व बाबींचे सखोल संशोधन केलेले आहे. विशेषतः स्वाती नक्षत्राबाबत अनेक रंजक आणि माहितीपुर्ण बाबी उलगडून दाखविल्या. तसेच साधारण सात हजार वर्षांपूर्वी महाभारत घडले. त्याचाही तारीखवार तपशील आपण काढु शकतो, असे सांगत त्यांनी उदाहरणादाखल काही दाखले दिले. त्यासाठी त्यांनी मंगळ ग्रहाच्या विविध स्थितींची माहिती दिली. दरम्यान, सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक म्यूझिकल अँड सोशल फाऊंडेशन प्रस्तुत सदाबहार रफी  अर्थात रफियाना हा गाण्यांचा कार्यक्रम झाला. यामध्ये संजय डेरे, घनश्याम पटेल, प्रदीप दाणी, प्रशांत पगारे, सुभाष ईसोकर, डॉ. रेखा सोनवणे, स्मिता पांडे, अनिता शिरोडे, मनोहर देवरे, अजय पाटील, अमित गुरव, सचिन बेडिस यांनी सदाबहार हिंदी गिते सादर केली.

Share: