IMG-LOGO
राष्ट्रीय

सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व : शरद पवार

Thursday, Oct 10
IMG

देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला.

मुंबई, दि. १० : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी शोक व्यक्त केला आहे. जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतून देशाचा लौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. देशावर ओढवणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवी अशा प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी सदैव मदतीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव सदैव स्मरणात राहील. सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तिमत्त्व रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली!” असे ते म्हणाले.

Share: