IMG-LOGO
लोकसभा २०२४

लोकसभेसाठी नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून दाखल केला अर्ज, काल भैरव मंदिरामध्ये पूजा

Tuesday, May 14
IMG

काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी यांनी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला.

वाराणसी, दि. १४ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज वाराणसीमधून लोकसभेसाठी अर्ज दाखल केला. वाराणसीमधून पंतप्रधानांनी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. या ठिकाणी 1 मे रोजी मतदान होणार आहे. आज सकाळी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर मोदी यांनी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करण्याआधी नरेंद्र मोदी वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी पूजा केली. पंतप्रधान उमेदवारी अर्ज दाखल करत असताना एनडीएकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी 18 पेक्षा जास्त कॅबिनेट मंत्री उपस्थित होते. अनेक मोठे नेते यावेळी हजर  होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्ज दाकल करत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. यासोबतच राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोळे आणि त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा उपस्थित होते. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील होते. नरेंद्र मोदी अर्ज दाखल करत असताना अयोध्येत राम मंदिरातीलरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 'मुहूर्त' ठरवणारे पंडित गणेशवर शास्त्री यावेळी त्यांच्या शेजारी चार प्रस्तावकांपैकी एक म्हणून बसले होते. चार प्रस्तावकांपैकी एक ब्राह्मण, दोन ओबीसी आणि एक अनुसूचित जातीचे आहे. 

Share: