IMG-LOGO
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 Phase II : पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना घातली साद

Friday, Apr 26
IMG

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई, दि. २६ : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील  १२ राज्यं आणि एक केंद्रशासित प्रदेशासह ८९ मतदारसंघात मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्वीट करत मतदारांना साद घातली आहे. त्यात  लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात, आज मतदान होत असलेल्या, मतदारसंघामधील सर्वांना विक्रमी संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो. मतदानाचे प्रमाण वाढल्याने आपली लोकशाही बळकट होते. विशेषतः आपल्या युवा आणि महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे माझे आवाहन आहे. तुमचे मत म्हणजे तुमचा आवाज! असे ट्वीट त्यांनी केले आहे. राहुल गांधी यांनी माझ्या प्रिय देशवासियांनो! आज या ऐतिहासिक निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे जो देशाचे भवितव्य ठरवणार आहे. पुढचे सरकार 'काही अब्जाधीशांचे' की '१४० कोटी भारतीयांचे' हे तुमचे मत ठरवेल. त्यामुळे आज घराबाहेर पडून ‘संविधानाचा सैनिक’ बनून लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. असे ट्वीट त्यांनी केले आहे. 

Share: