एका कारमधून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.
पुणे, दि. २१ : निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीची घोषणा करताच राज्यातील घडामोडी वेगवान झाल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर केल्या जात आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर झाली असून महाविकास आघाडी व महायुतीमधील अन्य घटक पक्षांच्या उमेदवार याद्या पुढील काही तासात जाहीर होण्याची शक्यता आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार असून त्या आधीच पुण्यात मोठं घबाड सापडलं आहे. एका कारमधून पोलिसांनी ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असताना येथील खेड शिवापूरच्या परिसरात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. खासगी वाहनातून अंदाजे पाच कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. ही गाडी पुण्यातून कोल्हापूरच्या दिशेने जात होती.