IMG-LOGO
लोकसभा २०२४

राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; दोन्ही नेते भाषण न देताच माघारी

Monday, May 20
IMG

राहुल गांधी आणि अखिलेश यादव हेलीकॉप्टरने आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी जमाव अनियंत्रित झाला.

फूलपूर, दि. २० :  यूपीमधील फूलपूर आणि प्रयागराज येथे अखिलेश यादव व राहुल गांधी यांची संयुक्त रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्ते बैरिकेडिंग तोडून स्टेजच्या जवळ पोहोचले. त्यानंतर फूलपूरमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश स्टेजवर उपस्थित नेत्यांना भेटून निघून गेले. दोन्ही नेत्यांनी सभेला संबोधितही केले नाही.प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गोंधळ झाला. अनियंत्रित झालेला जजमाव बॅरिकेडिंग तोडून स्टेजजवळ पोहोचला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर चेंगराचेंगरी झाली. घटनेचे गांभीर्य पाहून राहुल-अखिलेश भाषण न देताच परतले. रॅलीचे आयोजन फूलपूर लोकसभा मतदारसंघात केले गेले होते. राहुल आणि अखिलेश आल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठी गर्दी झाली. राहुल गांधी आणि अखिलेश यादव हेलीकॉप्टरने आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी जमाव अनियंत्रित झाला.

Share: