आम्ही एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सरकारवर दाबाव आणू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
नवी दिल्ली, दि.२५ : निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात किमान आधारभूत किंमतीच्या कायदेशीर हमीचा उल्लेख केला होता. आम्ही यासंदर्भात अभ्यास केला आहे. त्यामुळे किमान आधारभूत किमतींसाठी कायदेशीर हमी लागू केली जाऊ शकते, हे मी ठामपणे सांगू शकतो, असं राहुल गांधी म्हणाले. यासंदर्भात आम्ही लवकरच इंडिया आघाडीच्या नेत्याची बैठक घेणार असून या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली जाईल. त्यानंतर आम्ही एमएसपीच्या कायदेशीर हमीसाठी सरकारवर दाबाव आणू अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.