IMG-LOGO
राष्ट्रीय

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी; राहुल गांधींना विरोधीपक्षनेते पद देण्याची तयारी

Sunday, Jun 09
IMG

बैठकीमध्ये राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी असा ठराव करण्यात आला आहे.

दिल्ली, दि. ९ : मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असतानाच तिथं राहुल गांधी यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.२०१४ व २०१९ मध्ये काँग्रेस हा विरोधी पक्षांतील मोठा पक्ष असला तरी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी किमान दहा टक्के जागा म्हणजे ५५ जागा पक्षाने जिंकल्या नव्हत्या. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद दिले गेले नव्हते. आता मात्र, सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळू शकेल.बैठकीमध्ये राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारावी असा ठराव संमत करण्यात आल्याची माहिती संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. राहुल यांना विरोधी पक्षनेते होण्यासाठी आग्रह आहे, तर काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती देण्यात आली आहे. 

Share: