IMG-LOGO
लोकसभा २०२४

मोदींना पंतप्रधान करण्याबाबत बोलणारे राज ठाकरे पहिले व्यक्ती : फडणवीस

Monday, Apr 08
IMG

विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, त्यांनी.." असं फडणवीस म्हणाले.

मुंबई, दि. ८ : मनसेशी गेल्या काळात काही चर्चा झाल्यात, हे खरं आहे. विशेषतः मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यापासून आमची त्यांच्याशी जवळीक वाढली. आमची अपेक्षा आहे की... राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एंडॉर्समेंट केलं होतं. जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदींना पंतप्रधान बनवलं पाहिजे." असं फडणवीस म्हणाले."मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिकाही घेतली, मात्र आज त्यांना देखील हे मान्य असेल, की ज्याप्रकारे दहा वर्षांत मोदींनी भारताचा विकास केला, नवभारताची निर्मिती केली, अशा परिस्थितीत सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. राज ठाकरे हे २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाबाबत बोलणारे पहिले व्यक्ती होते, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधलं. विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, त्यांनी.." असं फडणवीस म्हणाले.

Share: