IMG-LOGO
नाशिक शहर

नाशिकमध्ये सह्याद्री मित्र संमेलन ३० जूनला; जनजागृतीसाठी २०० सायकलिस्टची रॅली

Sunday, Jun 23
IMG

जागतिक कीर्तीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांचे हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली.

नाशिक, दि. २३ : सह्याद्री मित्र संमेलन २०२४ च्या द्वितीय पर्वासाठी जनजागृतीचा एक भाग म्हणून रविवारी (दि. २३) सह्याद्री मित्र संमेलन नाशिक यांचेतर्फे,  नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सहकार्याने  नाशिकमधील प्रमुख रस्त्यांवरून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जागतिक कीर्तीचे सायकलिस्ट डॉ. महेंद्र महाजन यांचे हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरवात करण्यात आली. नामवंत ट्रेकर तथा नाशिकचे क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी नाशिक साईकलीस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे आणि सचिव संजय पवार आपल्या जवळपास २०० सायकलिस्ट सदस्यांसह रॅलीत सहभागी झाले. या रॅलीत ७  वर्षाच्या मुलापासून ते ७० वर्षांच्या प्रौढा पर्यंत सर्वांनी संपूर्ण रॅलीत उत्साहाने सहभाग नोंदवित संमेलेनाविषयीं जनजागृती पर घोषणा दिल्या. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून सुरु झालेली ही रॅली मायको सर्कल, बॉईस टाउन स्कूल, महात्मा नगर, ABB सर्कल, सिटी सेन्टर मॉल मार्गे, गोविंद नगर, मुंबई नाका, गडकरी चौक, सिबिएस, अशोक स्तंभ, जेहान सर्कल, भोसला स्कूल, कॉलेज रोड मार्गे अतिशय शिस्तबद्ध रीतीने फिरत गुरुदक्षिणा हॉल येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. 29 रोजी चे फोटोग्राफी प्रदर्शन व दिनांक 30 रोजी चे सह्याद्री मित्र संमेलन यासाठी सर्व नाशिककरांनी दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Share: