IMG-LOGO
मनोरंजन

वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खानने खरेदी केली बुलेटप्रूफ कार

Saturday, Oct 19
IMG

सलमान खानला वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खानने एक खास बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे.

मुंबई, दि. १९ :  अभिनेता सलमान खानला ठार करण्यासाठी बिश्नोई गँगने २५ लाखांची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँग पुन्हा चर्चेत आली. सलमान खान त्यांच्या टार्गेटवर आहे हे आधीही समोर आलं होतं. आता सलमान खानला मारण्यासाठी बिश्नोई गँगने २५ लाखांची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात त्याच्या घराबाहेर गोळीबारही झाला होता. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या झाली. त्यानंतर आता सलमान बाबत ही माहिती समोर आली आहे.सलमान खानला वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खानने एक खास बुलेटप्रूफ कार देखील खरेदी केली आहे. सलमानने सलमान खानची ही बुलेट प्रूफ कार निसान पेट्रोलl भारतीय बाजारात मात्र उपलब्ध नाही. त्यामुळे निसान पेट्रोल ही  जवळपास २ कोटी रुपयांच्या घरात असलेली कार सलमान खानने दुबईवरून खरेदी केली आहे. बुलेटप्रुफिंग क्षमतेमुळे आणि इतर फीचर्समुळे या कारची किंमत देखील वाढली आहे. सलमान खानवर काळवीट शिकार प्रकरणी एक केस सुरू आहे. या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नाई सलमान खानला वारंवार धमकी देत आहे. अगदी त्यामुळे सलमान खानने बुलेटप्रूफ एसयुव्ही कार खरेदी केली आहे.

Share: