वंचित आरक्षण बचाव यात्रा काढली जात असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबई, दि. २४ : महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन हे दोन समाज आमने-सामने आले असून त्यावरून गावागावात आणि नेत्यांमध्येही जातीय तणाव पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजात जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी वंचित आरक्षण बचाव यात्रा काढली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार, अजित पवारांचा पक्ष असं म्हटलं आहे.