२०१४ ते २०१९ हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात विकासासाठी सर्वात जास्त लक्षात राहिल असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली.
पुणे, दि. २२ : मराठा आरक्षणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शरद पवारांवर निशाणा साधला. भाजपची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण मिळतं. मात्र शरद पवारांचं सरकार येतं तेव्हा आरक्षण गायब होतं, असं वक्तव्य अमित शाहांनी पुण्यातील भाजप मेळाव्यात बोलताना केलं. मराठा आरक्षण पाहिजे तर भाजपचं सरकार आणा, असं आवाहनही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं. तसेच भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असेल तर शरद पवार आहेत अशी टीका अमित शाह यांनी केली आहे. भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं आहे अशी घणाघाती टीका अमित शाह यांनी केली. आता या विधानावरून राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, त्यांना प्रमुख लक्ष्य केले. काँग्रेस काळात, शरद पवार केंद्रात मंत्री असतांना महाराष्ट्रावर कसा अन्याय झाला यावर भाष्य केल. २०१४ ते २०१९ हा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात विकासासाठी सर्वात जास्त लक्षात राहिल असं सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची स्तुती केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातून रवाना होण्याआधी आणखी एक बैठक घेतली. पुण्यातील जेडब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठक झाली. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.