२४ तासात सर्व कामे होणार पूर्ण व दररोज होणार साफसफाई करण्यात येणार असल्याने नगरसेविका किरण गामणे-दराडे, बाळा दराडे यांनी ठिय्या व उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
नाशिक, दि. १७ : आठ दिवसापूर्वी नगरसेविका किरण गामणे व बाळा दराडे यांनी प्रशासनाला स्टेडीयममधील समस्यांबाबत निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर कुठलीही हालचाल न झाल्यामुळे अखेर शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. सकाळी नऊ वाजेपासून क्रीडांगणामध्येच ठिय्या आंदोलन व उपोषण सुरु करताच तत्काळ साफसफाई व गवत काढण्याचे काम प्रशासनाने काम चालू केले आंदोलन स्थळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, काँग्रेस सिडको अध्यक्ष विजय पाटील यांनी भेट देताच प्रशासनाची एकच धावपळ उडाली. तत्काळ सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. व येत्या चोवीस तासात सर्व कामे पूर्ण होतील असे आश्वासन दिले. सदर आंदोलन प्रसंगी सुभाष गायधनी, दत्तू तडाखे, सचिन बागुल, तबरेज शेख, नाना पाटील, तेजस भागवत, युवराज सोनार, तन्मय शिंदे, विक्रांत सांगळे, दीपाली बागुल, यांच्या सह विविध खेळाडू क्रीडाप्रेमी उप्पस्तिथ होते सर्व नागरिकांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.